विद्यार्थ्याचे नाव :शिवम संतोष थोरात

साथीदाराचे नाव : फासे सुदर्शन मोहन

मार्गदर्शक शिक्षकांचे नाव : अरुण दिक्षित सर ,विश्वास सर `

प्रकल्पाचे नाव : BIO DRUM तयार करणे.




अ क्र विषय  
१.) प्रस्तावना 
२.) उददेश
३.) साहित्य
४.) साधने
५.) कृती   
६.) साध्य
७.) उपयोग
८.) अडचणी /अनुभव
९.) अंदाजपत्रक



प्रस्तावना:-
सध्या सर्वांना घरातील ओल्या कचऱ्याची समस्या  भेडसावत आहे, मुख्यतः किचन मधील कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न गंभीर होता पण त्याला एक उपाय होता तो म्हणजे गांडूळखतासाठी वापर करणे, पण त्या कचऱ्याचे खतात रूपांतर खतात होण्यासाठी खूप कालावधी लागतो तेवढा कालावधी आपल्याजवळ नसतो,दीक्षित सरांनी आम्हाला सांगितले कि कचरा लवकर कसा कुजवता येईल आणि नंतर आम्ही कामाला लागलो.
उददेश :
आमचा हा प्रकल्प तयार करण्याचा एकच उद्देश होता की, घरातील ओल्या कचऱ्याचे लवकरात लवकर खतात कसे रुपांतर करता येईल.
साहित्य:-
आम्हाला त्यासाठी वेगवेगळे साहित्य लागले ते खालीलप्रमाणे....
 १.)ड्रम
 २.)स्क़्वेअर टूब  (२*२)
 ३.)L-अँगल (२५*२५*३)
 ४.)नट बोल्ट
 ५.पट्टी
 ६.)पाईप
साधने:-
वेल्डिंग मशीन,वेल्डिंग रॉड,कटर मशीन,मोजपट्टी, रोलर मशीन,ड्रिल मशीन,पेन्सील.

कृती:-
पहिल्यांदा आम्ही दिक्षित सरांनी सांगितलेली कन्सेप्ट समजावून घेऊन मग नंतर प्रकल्प करण्यास सुरुवात केली
१.)प्रथम आम्ही ६ mm रॉड, पट्टी वापरून ड्रम भोवती एक टोपली सारखे जाले तयार केले, पण त्याचे वजन आणि ड्रम वरून ते घसरत असल्यामुळे ते आम्ही वापरले नाही २.)नंतर आम्ही फक्त पट्टी वापरून ब्रॅकेट तयार करण्याचे ठरवले.पट्टी रोल करण्यासाठी आम्ही रोलर मशीन चा वापर केला,परंतु तो पट्टी ब्रॅकेट ड्रम च्या वरून काढणे अवघड जात होते, म्हणून तेही आम्ही न वापरायचे असे ठरवले.

३.)या दोन्ही कृतींमध्ये आम्ही पूर्ण गोल करून ड्रम मध्ये बसवत होतो,त्यामुळे ते नीट ड्रम सोबत बसत नव्हते.

४.)म्हणून विश्वास सरांनी आम्हाला अर्धे अर्धे ब्रॅकेट तयार करून पाहायला सांगितले,अर्धे अर्धे ब्रॅकेट नट बोल्टने घट्ट करावयास सांगितले

५.)आम्ही विशाव्स सरांची कल्पना वापरून ब्रॅकेट तयार करण्याचे ठरवले.आम्ही पहिल्यांदा ड्रमचा व्यास काढला  नंतर त्याचा परीघ काढला,पण परीघ पूर्ण वर्तुळाचा येत होता म्हणून त्या आलेल्या परिघाला २ ने भागून त्याला दोन भागात वेगळे केले,नंतर पट्टी रोल करण्यासाठी रोलर मशीन चा वापर केला. नंतर त्या पट्ट्या आंम्ही ऐरणी व नीट ठोकून घेऊन त्याला नंतर नट बोल्ट बसवण्यासाठी ड्रिल मशीनने त्या पट्टीला होल पाडले.नंतर आम्ही त्या पट्ट्यांना वरील अर्ध्या आणि मधली अर्ध्या पट्टीस वेल्ड केले.वेल्ड केल्यानंतर त्या पट्ट्या आम्ही नट बोल्ट वापरुन ड्रम भोवती ब्रॅकेट सारखे बसवून घेतले.

६.)नंतर आम्ही तयार झालेल्या ड्रम साठी गोल फिरवून खत मिळवण्यासाठी आम्ही त्यासाठी एक स्टॅन्ड तयार करायला घेतले.त्यासाठी आम्ही (२*२)चा  स्क़्वेअर टूब आणि  वापरून (२५*२५*३) L-अँगल, पाईपचा वापर करून एक स्टॅन्ड तयार केला.

साध्य:-
आम्हाला साध्य करायचे होते कि घरातील ओला कचरा वापरून त्याचे लवकरात लवकर खत तयार करणे.
उपयोग:-
ह्या बायो ड्रमचा उपयोग आपण प्रत्येक घरांमध्ये मोठमोठ्या वसाहतींमध्ये देखील करू शकतो. त्यामुळे प्रत्येक घरातील ओल्या कचऱ्याची घरांमध्येच विल्हेवाट लागेल. यातून तयार होणारे खत आपण आपल्या परिसरात असणाऱ्या झाडांना, लहान फुल झाडांना, किंवा शेतात देखील त्याचा वापर करू शकतो.
अडचणी:-
आम्हाला प्रकल्प तयार करताना वीजेची आणि काही साहित्य वेळेवर मिळाले नाही.  
अनुभव:-
आम्हाला असा अनुभव आला की  रोलर कसे वापरायचे असते, वेल्डिंग करतान असे समजले की वेल्डिंग नेहमी ४५ अंशात वेल्डिंग रॉड ठेऊन करावी,मोठे ड्रिल मशीन कसे चालवायचे याचा अनुभव आला.


Comments

Popular posts from this blog