दिनांक :५/१२/२००१६

               
   मल्चिंग पेपर बसविणे .


झाडांना दिलेल्या  पाण्याचे बस्पिभवन थांबवणे यासाठी मल्चिंग पद्धतीचा वापर करतात . 
 

साहित्य :मल्चिंग पेपर ,इनलाईन ड्रीपर पाईप लाईन ,१इन्चि पी वी सी पाईप .......

साधने : खुरपे ,फावडे ,घमेल ,इत्यादी .......

प्रत्यक्षिक कृती : :पिकला आवस्यक ओलावा धरून ठेवण्यासाठी वापरात येण्यारया मटेरियल पद्धत म्हणजे मल्चिंग होय .” 



         जमिनीची मशागत करून बेड तयार झाल्यावर पाणी मारणे . इनलाईन ड्रीपर पाईप लाईन पसरून त्यावर मल्चिंग पेपर बसवणे .
          मल्चिंग पेपर हा पातळ असून त्याला काळी व राखाडी बाजू असतात .काळा कलर हा प्रकास किरण आकर्षित करतो .व राखाडी कलर प्रकास प्रवर्तित करतो .त्यामुळे बेडवर आद्रता ठेवली जाते .प्रकास खाली जात नसल्याने गवत वाढत नाही .याच फायदा रोपांना होतो .



दिनांक :८/१२/२०१६

                     चिक्की बनवणे 
.
साहित्य : कच्चे शेंगदाणे ,गुळ ,ग्लुकोज पावडर ,तुप इत्यादी ........

साधने : ग्यास ,कडई ,चमचा ,चिक्की साचा इत्यादी ......

टिप : चिक्कीचे दोन प्रकार आहेत .१] लो फॅट चिक्की व २] फॅटयुक्त चिक्की

       लो फॅट चिक्की बनवणे .

शेंगदाणे व गुळाचे प्रमाण १;१ ठेवणे .वजन करून घेतले.शेंगदाणे थोडे गरम करून तेल काडून घेतले .गुळ बारीक करून पाक तयार केला .त्यात थोडे तुप व पातळ होईपर्यंत हलवणे .त्यात ग्लुकोज पावडर टाकून शेंगदाणे टाकणे व हलवणे .साच्याला व कटरला  तेल लावून पुढील २ मिनटात मिश्रण ओतून कटरने कापणे .व तयार चिक्की प्याकेजिंग करणे .





चीक्कीसाठीचे प्रमाण :- १] गुळ :-१ किलो .


                    २]शेंगदाणे :-१ किलो.

                    ३] तूप :-५० ग्य्र्म.

                    ४] ग्लुकोज पावडर:-२० ग्र्यम. 


१किलो शेंगदाणा चीक्कीसाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-


अनु क्र.
मालाचे नाव
एकून माल
दर
एकून किमत
१]
शेंगदाणे
१ किलो
९०
९०
२]
गुळ
१ किलो
४४
४४
३]
ग्लुकोज पावडर
२० gm
४०
०.१०
४]
तूप
20gm
१००
१०
५]
तेल
20gm
७५
१.५
७]
प्याकेजिंग
10 minit
१०
८]
इंधन
10 minit
१५
9]
मजुरी
25%
-
३८.९
10
एकून खर्च :
   -
   -
१९४ .५



दिनांक :११/१२/२०१६  
     
                     टोमॅटो सॉस बनवणे.

  टोमॅटो सॉस बनवून विक्री करणे .त्यामधून नफा मिळवणे .प्रात्यक्षिक कृती : टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून प्रेशर कुक्क्र्मध्ये शिजवून घ्यावेत .शिजवलेल्या टोमॅटो मधून बिया व साल वेगळे करणे.


.तयार पल्पला उष्णता देऊन घट्ट करणे .त्यावेळेस त्यात कांदा ,लसून ,मिरी ,दालचिनी ,लवंग ,वेलची ,व्हिनेगर पाणी ,मीठ व साखर टाकून हलवणे .

       अशा प्रकारे टोमॅटो सॉस प्याकेजिंगसाठी तयार होतो
 .  
टोमॅटो सॉस बनवण्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-



अनु क्र.
मालाचे नाव
एकून माल
दर
एकून किमत
१]
टोमॅटो
2kg
१० रु.
१.९७०
२]
साखर
200gm
35 रु.
७.६
३]
दालचिनी
0.5gm
45 पै.
45 पै.
४]
वेलची
0.5gm
२२पै.
२२पै.
५]
व्हिनेगर
5ml
२२पै.
२२पै.
६]
सोडियम मेंझीन
0.12gm
१रु .
१रु .
७]
लाल तिखट
5gm
१.६रु.
१.६रु.
८]
मीठ
2gm
३६पै .
३६पै .
९]
लवंग
0.5gm
४५पै .
४५पै .
१०]
जीर
0.5gm
१२पै .
१२पै .
११]
काळीमिरी
0.5gm
१रु .
१रु .
१२]
प्याकेजिंग
5
५रु.
५रु.
१३]
इंधन
20minit
१५रु
१५रु
१४]
मजुरी
25%

१४.४२ रु.
१५]
एकून खर्च :-
  -
  -
७२.१९

म्हणून २किलो टोमॅटो पासून ३७२ ग्र्याम टोमॅटो सॉस तयार झाला .


दिनांक :१२/१२/२०१६

        तुषार सिंचन व ठिबक सिंचन पद्धत अभ्यासने .

 तुषार सिंचन व ठिबक सिंचन पद्धत वापरून शेती ,भाजीपाला ,यांना पाणी किंव्हा रसायन देणे.

पुढील पद्धतीनुसार माहिती :-

१] तुषार सिंचन :- 

जेव्हा ५०% पाणी शेतीला द्यावयाचे असते त्यावेळी हि पद्धत वापरतात .यामध्ये
 पाण्याच्या प्रेशर वर तुषार सिंचन काम करते .यामध्ये मायक्रो स्प्रीक्लर ,मिनी स्प्रीक्लर अशा प्रकार असतात .हे स्प्रीक्लर योग्य जागेनुसार ठराविक अंतरासाठी ठरवलेले असतात .


२] ठिबक सिंचन :- जेव्हा भाजीपाला किंव्हा कोणतेही फुटावर लावलेजाणारे रोप यांसाठी ठिबक सिंचन पद्धत वापरतात .यामध्ये दोन प्रकार आहेत .१] इनलाईन , २] आवुटलाइन ....

.
१] इनलाईन:- हि पद्धत मल्चिंग पद्धतीत वापरतात .जेणेकरून मल्चिंग पेपर लवकर फाटू नये .


२] आवुटलाइन : - मिरची ,tomyato,यांसारख्या रोपांसाठी हि पद्धत वापरतात .


१] तुषार सिंचन पद्धतीचे फायदे व तोटे  :-

फायदे :१] कमी वेळेत जास्त पाणी दिले जाते .
       २] प्रेशरमुळे पाणी फवारले जाते

तोटे :-पाणी ५० % वाया जाते .
      पाण्याचा प्रेशर कमी होहू नये .

२] ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे व तोटे :- 
फायदे :- १] रोपांना आवश्यक पाणीपुरवठा होतो 

.
         २] पाणी बचत केले जाते .


तोटे :- १] पाणी देताना कूप वेळ लागतो .

    या दोन पद्धती वापरून चांगल्याप्रकारे शेती किंव्हा भाजीपाला पिकवला जातो

Comments

Popular posts from this blog